Imtiyaz Jaleel : मला बिर्याणीच खायची, चिकन खुर्माची तयारी… स्वातंत्र्यदिनी नॉनव्हेज बॅन अन् जलीलांकडून मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

Imtiyaz Jaleel : मला बिर्याणीच खायची, चिकन खुर्माची तयारी… स्वातंत्र्यदिनी नॉनव्हेज बॅन अन् जलीलांकडून मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

| Updated on: Aug 15, 2025 | 9:00 AM

महाराष्ट्र सरकारने फर्मान काढले आहे, मग छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त काँग्रेसला फॉलो करणारे आहेत का..? असा सवाल करत १५ ऑगस्ट हा देशाचा मोठा सण आहे आणि यादिवशी मला बिर्याणी खायची असेल तर सरकार सांगणारे कोण? जलील यांनी असा सवाल केला.

स्वातंत्र्यदिन मोठा सण आहे. त्यादिवशी मला बिर्याणीच खायची आहे, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं. १५ ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनी महानगरपालिकेच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयावर इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण दिल्याचे पाहायला मिळत आहे. जलील म्हणाले, 15 ऑगस्ट रोजी मांस खाण्यावर बंदी आहे, पण काही ठिकाणीच आहे. भारत हा लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे. कोणाची हुकूमशाही येथे चालणार नाही. पुढे जलील यांनी असेही म्हटलं की, मी मुख्यमंत्री यांना आमंत्रण दिलेले आहे, ते व्हेज असतील तरी यावे, आणि मनपा आयुक्तांना तर विनंती करणार आहे, की त्यांनी माझ्याकडे बिर्याणी खायला यावं, चिकन खुर्माची तयारी केली आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) काही महापालिकांनी मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्री आणि कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांमुळे कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. 1988च्या एका कायद्याचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला असून, कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला विरोध केला जात आहे.

Published on: Aug 15, 2025 09:00 AM