Maharashtra Election 2026 Result | मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय

Maharashtra Election 2026 Result | मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय

| Updated on: Jan 16, 2026 | 4:56 PM

एमआयएमचा पाचवा उमेदवार विजयी झाला आहे. ही एमआयएमसाठी मोठी आनंदाची गोष्ट मानली जात आहे. प्रभाग क्र. 139 मधून एमआयएमच्या शबाना शेख यांनी विजय मिळवला असून त्यांच्या विजयामुळे पक्षाची मुंबईतील ताकद वाढली आहे.

मुंबईतील अतिशय मोठी घडामोड समोर आली असून एमआयएमचा पाचवा उमेदवार विजयी झाला आहे. ही एमआयएमसाठी मोठी आनंदाची गोष्ट मानली जात आहे. प्रभाग क्र. 139 मधून एमआयएमच्या शबाना शेख यांनी विजय मिळवला असून त्यांच्या विजयामुळे पक्षाची मुंबईतील ताकद वाढली आहे. निकाल जाहीर होताच एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मुंबईत भाजप 99 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर भाजप आणि शिवसेना मिळून 129 जागांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मिळून मुंबईत 72 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस आणि वंचित आघाडीने 15 जागांपर्यंत मजल मारली आहे. या निकालांमध्ये एमआयएमची घोडदौड सुरूच असल्याचे चित्र दिसून येते. या बदलत्या समीकरणांमुळे मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 16, 2026 04:56 PM