Ajit Pawar : संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

Ajit Pawar : संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 01, 2025 | 7:19 PM

Ajit Pawar On Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

कुणी एखादं वक्तव्य केलं तर ती पक्षाची भूमिका नसते, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी हे विधान केलं आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. सकाळीच अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली आहे.

याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, कधी कोणत्या व्यक्तीने एखादं विधान केलेलं असतं. ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते. मधल्या काळात माझ्या एका विधीमंडळातल्या सहकाऱ्याने एक वक्तव्य केलं. आजच सकाळी मी त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं ही आपल्या पक्षाची भूमिका नाही. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हंटलं.

Published on: Jul 01, 2025 07:19 PM