जय पवारांना उमेदवारी? अजितदादांकडून अखेर चर्चांना पूर्णविराम

जय पवारांना उमेदवारी? अजितदादांकडून अखेर चर्चांना पूर्णविराम

| Updated on: Nov 09, 2025 | 4:13 PM

अजित पवारांनी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, एक रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा यावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी चौकशीची मागणी केली. तसेच, जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

अजित पवारांनी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. “एक रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा, याच आश्चर्य आहे,” असे ते म्हणाले. या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही आणि त्यात अर्थ नाही असे सांगत, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल असे अजित पवारांनी नमूद केले. निवडणुका जवळ आल्या की असे आरोप सुरू होतात, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, अजित पवारांनी जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे पवारांनी सांगितले. या प्रकरणावर बोलताना रोहित पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले, तर मुरलीधर मोहोळ यांनी दोषींवर कारवाई होईल अशी भूमिका मांडली. पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Nov 09, 2025 04:13 PM