Ajit Pawar Funeral LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
ajit pawar funeral maharashtra deputy cm : अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी देशभरातील अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. श्रद्धांजली सभेदरम्यान शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. काटेवाडी ते बारामती असा त्यांचा अखेरचा प्रवास पहाटेपासून सुरू झाला असून, यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. दादा नावाने लोकप्रिय असलेले अजित पवार त्यांच्या कठोर परिश्रमासाठी आणि पहाटेपासून कामाला लागण्याच्या सवयीसाठी ओळखले जात होते.
अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण राजकीय मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राबाहेरील खासदार कृष्णाजी देवरायू, महसूल मंत्री प्रसाद आणि खासदार सी.एम. रमेश, श्रीनिवास रेड्डी यांसारख्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
महाराष्ट्रातून मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोरे, अदिती तटकरे, वनमंत्री गणेश नाईक, पंकजा मुंडे, तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. याप्रसंगी, दादा यांनी दिलेल्या शिस्तीच्या मूलमंत्राचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
