Marathi News Videos Ajit Pawar has criticized that government advertisements are very misleading and deceiving people

अजित पवार यांचा हल्लाबोल; ‘शिंदे-फडणवीस सरकराचं डोकं थाऱ्यावर हाय का’? थेट विचारणा? जाहिरातीवरूनही टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सरकारी जाहिरातीवरून हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सरकारी जाहिरातीवरून हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारची सुरू असलेली जाहिरातबाजी तारतम्य सोडून तर आहेच पण जनतेच्या पैशाची निव्वळ उधळपट्टी असल्याची टीकाही केली आहे.
Published on: Jun 07, 2023 7:07 AM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार