हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन् संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन् संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

| Updated on: Apr 04, 2025 | 2:31 PM

'आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन', असं म्हणत राऊतांनी पटेलांना टोकाचा इशाराही दिला.

वक्फ विधेयकावर बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांनी रंग बदलले असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्याकडून सकाळच्या पत्रकार परिषदेतून सडकून टीका करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘बाप बदलणारे लोकं मला रंग बदलले असे म्हणतात.’, असं संजय राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, ‘आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून हा माणूस पळाला. शरद पवार त्यांचा बाप आहे. आदरणीय शरद पवार हे त्यांच्या वडिलासमान होते. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळाले. त्यांनी आम्हाला निष्ठा सांगू नये. पाकिस्तानात बसलेल्या दाऊदशी कुणाचे संबंध आहे? मी आरोप करत नाही. मोदींनीच हे आरोप केला होता.’ पुढे ते असेही म्हणाले, भाजपमध्ये जाऊन बूट चाटून त्यांची चाटूगिरी करून आरोप धुण्याचा प्रयत्न केला. भाजपचे बूट चाटून क्लीनचिट मिळाली, असे म्हणत राऊतांनी पटेलांवर हल्लाबोल केला.

Published on: Apr 04, 2025 02:31 PM