Ajit Pawar NCP : मी लावणी आर्टिस्ट अन्… दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील ‘तो’ Video व्हायरल होताच शिल्पा शाहीर यांची प्रतिक्रिया

Ajit Pawar NCP : मी लावणी आर्टिस्ट अन्… दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील ‘तो’ Video व्हायरल होताच शिल्पा शाहीर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Oct 27, 2025 | 8:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारा गाण्यावर लावणी नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकाराचा निषेध करत कारवाईचा इशारा दिला आहे. यावर लावणी सादर करणाऱ्या शिल्पा शाहीर यांनी स्पष्टीकरण दिले की, त्या स्वतः राष्ट्रवादीशी संबंधित असून, त्यांना आमंत्रित केले होते आणि त्यांनी केवळ एक छोटासा परफॉर्मन्स सादर केला.

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारा या प्रसिद्ध गाण्यावर लावणी नृत्य सादर करण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याला निषेधार्ह म्हटले आहे. तसेच, या घटनेप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या व्हायरल व्हिडिओ आणि पटेल यांच्या इशाऱ्यानंतर, लावणी सादर करणाऱ्या कलावंत शिल्पा शाहीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

नागपूरच्या रहिवासी असलेल्या शिल्पा शाहीर यांनी स्पष्ट केले की, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित या दिवाळी मिलन कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी नमूद केले की, त्या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेल्या आहेत आणि सध्या त्यांच्या चहा पाण्याला पाहुणं बोलवा ना तसेच रायबा इमानदार या चित्रपटातील लावण्या चर्चेत आहेत. मैत्रिणी रेखाताई चरडे आणि सुनीता येरणे यांच्या आग्रहावरूनच आपण या कार्यक्रमात पोहोचलो असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यात आपलाही सत्कार होता. पुरुषही नाचत होते. एक लावणी कलाकार असल्याने, त्यांना तिथे लावणी सादर करण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी एक छोटीशी लावणी सादर केली, असे शिल्पा शाहीर यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 27, 2025 08:20 PM