Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीत बंडाचं निशाण, जिल्हाध्यक्षच देणार राजीनामा? भरणेंच्या तालुक्यात घडतंय काय?

Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीत बंडाचं निशाण, जिल्हाध्यक्षच देणार राजीनामा? भरणेंच्या तालुक्यात घडतंय काय?

| Updated on: Nov 13, 2025 | 2:23 PM

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत इंदापूर येथे बंडखोरीचा झेंडा फडकवण्यात आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या धोरणाविरोधात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बंडखोरीचा झेंडा फडकवण्यात आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या धोरणाविरोधात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी उपाध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर यांनी आपण १७ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजीनामा देऊन पॅनलच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच तिकीट दिले जाईल. महापालिका निवडणुकीची सोडत निघाल्यानंतर अनेक वॉर्डांमधील आरक्षणात बदल झाल्याचे दिसून येत आहे.

Published on: Nov 13, 2025 02:23 PM