दौंड गोळीबार प्रकरण; ‘तो’ आमदार मांडेकरांचा भाऊ…; अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

दौंड गोळीबार प्रकरण; ‘तो’ आमदार मांडेकरांचा भाऊ…; अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jul 24, 2025 | 3:36 PM

दौंड येथील अंबिका कलाकेंद्रात गोळीबार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

दौंडमधील कला केंद्रात जो गोळीबार झाला, तो हवेत गोळीबार झाला. ते पाहून महिला बेशुद्ध पडली. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका अशा सूचना मी दिल्या आहेत. याप्रकरणात आमदार शंकर मांडेकर यांचा चुलत भाऊ आरोपी आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील अंबिका कलाकेंद्रात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या गोळीबारात कलाकेंद्रात नृत्य सादर करणारी एक तरुणी जखमी झाल्याची माहिती प्रथम समोर आली होती, परंतु याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. आमदाराच्या भावाचे नाव या घटनेत जोडले गेल्याने राज्यभरात यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Published on: Jul 24, 2025 03:36 PM