Ajit Pawar Passes Away : मी परत येईल; सगळं व्यवस्थित असंच ठेवा! ‘विजयगड’मधून निघताना अजित पवारांनी केल्या होत्या सूचना
नागपूरमधील अजित पवार यांच्या शासकीय विजयगड बंगल्यात त्यांच्या निधनानंतर भावूक वातावरण आहे. 2024 च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी डागडुजी केलेल्या बंगल्यासाठी दादांनी स्वतः सूचना दिल्या होत्या. 12 डिसेंबर रोजी पुण्यासाठी रवाना होताना, मी नक्की परत येईन असे ते बोलले होते. आज त्यांच्या आठवणींनी परिसर गहिवरला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थान विजयगड बंगल्यात अतिशय भावूक वातावरण आहे. 2024 च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विजयगड बंगल्याची डागडुजी करण्यात आली होती, ज्यासाठी अजितदादांनी स्वतः सूचना दिल्या होत्या. बंगल्यातील प्रत्येक झाड आणि वस्तू त्यांच्या वास्तव्याची साक्ष देत आहेत, असे अधिकारी राजेंद्र बारई यांनी सांगितले.
12 डिसेंबर रोजी अजित पवार नागपूरमधील याच विजयगड बंगल्यातून पुण्याकडे रवाना झाले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बंगल्यातील सौंदर्य आणि लावलेल्या झाडांचे फोटो स्वतः काढले होते. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बोलताना, “या ठिकाणी हा बंगला आता खूप व्यवस्थित झालेला आहे आणि इथे ह्या संपूर्ण गोष्टी जशा आहेत तशाच राहायला पाहिजेत. मी परत येईल. मी स्वतः याचे सगळे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत आणि मी नक्की परत येईल. तुम्ही सगळं व्यवस्थित असंच ठेवा,” अशा सूचना दिल्या होत्या.
आज दादा आपल्यासोबत नाहीत, याबद्दल मोठी खंत व्यक्त होत आहे. काळाने त्यांच्यावर घात केला आणि आता दादा कधीच विजयगड बंगल्यावर परत येणार नाहीत, असे बोलले जात आहे.
