Pune Municipal Election Results 2026 | पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच…

Pune Municipal Election Results 2026 | पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं, राष्ट्रवादीच कमबॅक नाहीच…

| Updated on: Jan 16, 2026 | 3:26 PM

पुणे महानगरपालिकेतून अजित पवार यांचे घड्याळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अलार्मऐवजी पुणेकरांनी अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजवल्याची चर्चा सुरू आहे. अजित दादांच्या मोफत योजनांचा पाऊस पुणेकरांनी साफ नाकारल्याचे निकालांमधून दिसून येत आहे.

पुणे महानगरपालिकेतून अजित पवार यांचे घड्याळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अलार्मऐवजी पुणेकरांनी अजित पवारांच्या घड्याळाचे बारा वाजवल्याची चर्चा सुरू आहे. अजित दादांच्या मोफत योजनांचा पाऊस पुणेकरांनी साफ नाकारल्याचे निकालांमधून दिसून येत आहे. त्याचबरोबर पुण्यात भाजपची सत्ता सुसाट वेगाने पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रचारसभेदरम्यान अजित पवार यांनी केलेल्या घोषणांवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं” असे परखड वक्तव्य करत फडणवीसांनी अजित पवारांच्या घोषणांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात मिळालेला हा निकाल अजित पवारांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पुण्यातील जनतेने विकासाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेत भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.

Published on: Jan 16, 2026 03:26 PM