akluj lavani mahotsav 2024 | इतर ठिकाणी नुसता धिंगाणा, अकलुजची लावणी एक नंबर, कलाकारांच्या प्रतिक्रिया

akluj lavani mahotsav 2024 | इतर ठिकाणी नुसता धिंगाणा, अकलुजची लावणी एक नंबर, कलाकारांच्या प्रतिक्रिया

| Updated on: Feb 10, 2024 | 5:00 PM

सोलापूरातील अकलूजचा लावणी महोत्सव सुरु झाला आहे. या लावणी स्पर्धेत क्रमांक पटकविण्यासाठी अनेक महिन्यांपासून कलाकारांकडून तयारी केली जाते. या लावणी महोत्सवाला राजकारणी लोकांकडून आधार मिळाला आहे. मोहीते-पाटील कुटुंबिय हा अकलुजचा लावणी महोत्सव दरवर्षी आयोजित करतात. या महोत्सवाला पाहायला पुरुष मंडळी सपत्निक येतात हे या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहे.

सोलापूर | 10 फेब्रुवारी 2024 : अकलुजची लावणी म्हणजे खरी अस्सल लावणी असते. इतर ठिकाणची लावणी म्हणजे नुसता धिंगाणा असतो अशी प्रतिक्रीया लावणी कलाकारांनी दिल्या आहेत. अकलूजचा ( akluj lavani mahotsav 2024 ) लावणी महोत्सव प्रसिद्ध असून या स्पर्धेत उतरून बक्षिस मिळविण्यासाठी लावणी कलाकार चार-चार महिने रिहर्सल करीत असतात असे लावणी कलाकरांनी म्हटले आहे. इतर ठिकाणी लावणी पाहायला पुरुष मंडळी येत असतात. परंतू अकलूजच्या महोत्सवाला पुरुष मंडळी सपत्निक येत असतात. त्यामुळे खूप चांगले वाटते. येथील लावणीमुळे आम्हाला नाव मिळते. चित्रपटात देखील संधी मिळते, आमचा आशा रुपा परभणीकर या ग्रुप प्रसिद्ध झाल्याचे महिला कलाकारांनी म्हटले आहे. मोहीते-पाटील कुटुंबियांकडून येथे दरवर्षी लावणी महोत्सवाचे आयोजन केले जाते. लावणीची खरी अदाकारी आणि दाद इथेच पाहायला मिळते लावणीला पण मान दिला जातो हे येथे पहायला मिळते असे या कलाकारांनी म्हटले आहे.

Published on: Feb 10, 2024 04:59 PM