Akola Crime News : प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

Akola Crime News : प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

| Updated on: Apr 07, 2025 | 8:39 AM

एका तरुणीवर प्रेमप्रकरणातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना आकोल्यातून समोर आली आहे. यात तरुणी गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

अकोल्याच्या बोरगांव मंजू जवळ एका तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष तिवरे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. संतोष आणि पीडित तरुणीमध्ये वाद झाल्यानंतर या आरोपीने हा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झालेली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर आरोपी संतोषला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Published on: Apr 07, 2025 08:39 AM