Sharad Pawar : साहेब वय वाढतंय…लग्नासाठी पोरगी द्या नाहीतर मी एकटाच…, पठ्ठ्याचं थेट शरद पवारांना पत्र! बघा पत्रात काय म्हटलंय?
ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याची समस्याही समोर आली. अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांना पत्नी मिळवून देण्यासाठी पत्र लिहिले आणि मुलगी शोधून देण्याचे आवाहन केलेय.
अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आपले लग्न होत नसल्याची व्यथा मांडली असून, पत्नी मिळवून देण्याची विनंती केली आहे. “माझे वय वाढत असून भविष्यात माझे लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन. माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्यामार्फत मिळवून द्यावी,” असे या तरुणाने पत्रात नमूद केले आहे.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगितले. देशमुख यांनी पुढे सांगितले की, “ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नाहीत, कारण शिक्षणामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या शहरांकडे आकर्षित होतात आणि त्यांना शहरी मुले पसंत करतात. ग्रामीण भागातील बेरोजगारी हे याचे एक प्रमुख कारण आहे.
Published on: Nov 13, 2025 05:49 PM
