Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा

Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा

| Updated on: Jul 06, 2026 | 12:11 PM

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले असतानाच मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातून सध्या शंभर टक्के विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना आणि नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे तसेच पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे.

पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान झाला असून पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात विशेष खबरदारी घेतली असून, वारकऱ्यांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, नदीपात्रात स्नान करणे, पाण्यात उतरणे किंवा नदीकाठावर गर्दी करणे टाळावे, असे आवाहन वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिक आणि वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 06, 2026 12:11 PM
Follow Us