Nashik मध्ये पोलीस ठाण्यात मद्य पार्टी, पोलीस हवालदार तर्राट

| Updated on: Mar 16, 2022 | 6:24 PM

आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासमोर मद्यपी पोलिसांची तक्रार केली. त्यांनी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला कशी वागणूक दिली, याची कैफियत मांडली. त्यानंतर आयुक्तांनी इतर चौक्यांचाही आढावा घेऊन तेथील काम ठीक नसेल, तर त्या बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

Follow us on

YouTube video player

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असणार्‍या गंगापूर पोलिस चौकीत काल रात्रीच्या सुमारास चार पोलीस कॉन्स्टेबल दारू पीत असल्याचे नागरिकांनी हा उघड केल्यानंतर त्या चारही मद्यपी पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. ड्युटी संपलेली असतानाही शासकीय गणवेशात तात्पुरता मान्यता असलेल्या पोलीस चौकीत दारू पीत असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाने ज्या पोलीस चौक्यांना शासनाची अथवा पोलीस महासंचालकांची मान्यता नाही अशा चौक्यांच्या गैरवापर होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे त्याचा आढावा घेऊन शासनाला सादर करून मनुष्यबळाअभावी बंद करण्यात यावा अथवा कमी करण्यात यावा यासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे नाशिक शहर  पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी सांगितलं.