‘…तर मग 12 मर्सिडीज कुठून आणल्यात?’, गोऱ्हेंचा नमकहराम उल्लेख करत ठाकरेंच्या बड्या नेत्याचा घणाघात

‘…तर मग 12 मर्सिडीज कुठून आणल्यात?’, गोऱ्हेंचा नमकहराम उल्लेख करत ठाकरेंच्या बड्या नेत्याचा घणाघात

| Updated on: Feb 24, 2025 | 5:16 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर विविध नेत्यांच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. गोऱ्हेंनी असं वक्तव्य करणं हे नमकहरामीपणा असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत.

शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर विविध नेत्यांच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे वक्तव्य करत संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केल्यानंतर अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांचा नमकहराम असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नीलम गोऱ्हे यांना सहा ते सात वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पदं देण्यात आली. तर मग १२ मर्सिडीज कुठून आणल्यात?’, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. नीलम ताईंनी नमकहरामी केली आहे. चार वेळा विधानसभापती पद मिळालं दोनदा उपसभापती पदं मिळालं… सहा पदं तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळाली तर तुम्ही १२ मर्सिडीज दिल्या का तुम्ही? असा सवाल करत १२ मर्सिडीज दिल्या असतील तर त्यासाठीचे पैसे कुठून आले तुमच्याकडे? तुम्ही दिली का तशी पावती? त्यामुळे हा नमकहरामीपणा आहे. शिवसेना प्रमुखांनी पहिले नीलम गोऱ्हे यांना दोन टर्मसाठी आमदार केलंय. तर उद्धव ठाकरेंनी दोन टर्म त्यांना आमदार केलंय, असं असतानाही नीलम गोऱ्हेंनी असं वक्तव्य करणं हे नमकहरामीपणा असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत.

Published on: Feb 24, 2025 05:15 PM