Ambadas Danve : सभागृहात पत्ते घेऊन रमी खेळलं पाहिजे, मोबाईलवर खेळायाची काय गरज! दानवेंच्या वक्तव्यानं चर्चा

Ambadas Danve : सभागृहात पत्ते घेऊन रमी खेळलं पाहिजे, मोबाईलवर खेळायाची काय गरज! दानवेंच्या वक्तव्यानं चर्चा

| Updated on: Jul 30, 2025 | 12:14 PM

कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक ट्वीट करत मंत्री माणिकराव कोकाटेंबाबतचा विधीमंडळ चौकशीचा अहवाल आला असल्याचे म्हटलं. रोहित पवारांनी ट्वीटमध्ये असाही दावा की,  १८ ते २२ मिनिटं सभागृहात कोकाटेंनी रमी गेम मोबाईलवर खेळला. यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.  माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, माझ्या माहितीप्रमाणे चौकशी झाली आहे, ज्यात कोकाटे अर्धा तास रम्मी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. पुढे दानवे असेही म्हणाले की, मंत्री संवेदनशील पाहिजे, त्यांना माफ केल्यास सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होईल. अन्यथा सभागृहात पत्ते घेऊन खेळले पाहिजे, मोबाईलवर खेळायाची काय गरज..? असं खोचक भाष्य देखील दानवेंनी यावेळी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 30, 2025 12:14 PM