Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबडेकरी संघटना आक्रमक

Chhatrapati Sambhajinagar : इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबडेकरी संघटना आक्रमक

| Updated on: Jun 23, 2025 | 2:57 PM

Protest Against Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर शहरात इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.

एमआयएमचे माजी खासदार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात जलील यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्द वापरल्याने आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय-अत्याचार कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. इम्तियाज जलील हे जातीवाद करत असून आंबेडकरी जनतेचा वारंवार अपमान करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांना अटक करून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे.

Published on: Jun 23, 2025 02:57 PM