America Flood : हाहाकार! टेक्सासमधील ग्वाडालुपे नदीला महापूर, 51 जणांचा मृत्यू

America Flood : हाहाकार! टेक्सासमधील ग्वाडालुपे नदीला महापूर, 51 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 06, 2025 | 4:54 PM

America Texas : अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी पहाटे ग्वाडालुपे नदीला महापूर आला. या महापूरामुळे मोठा विध्वंस बघायला मिळत आहे.

शुक्रवारी पहाटे अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालुपे नदीला आलेल्या महापुराने मोठा हाहाकार उडाला आहे. या आपत्तीमुळे मृतांचा आकडा 13 वरून 51 वर पोहोचला आहे. केर काउंटीला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे 15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आसपासच्या भागांतही अनेकांचा बळी गेला आहे.

ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी केवळ 45 मिनिटांत 26 फूट वाढली, ज्यामुळे झाडे उन्मळून पडली, वाहने पाण्यात वाहून गेली आणि अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. हजारो घरे जलमग्न झाली आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत 850 हून अधिक लोकांचे जीव वाचवले आहेत. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी सांगितले की, बचाव आणि मदत कार्य सतत सुरू आहे. मात्र, स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त असून, पूरासारख्या आपत्कालीन परिस्थितीची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Published on: Jul 06, 2025 04:54 PM