Loksabha Session LIVE : विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही; अमित शाह संसदेत भडकले

Loksabha Session LIVE : विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही; अमित शाह संसदेत भडकले

| Updated on: Jul 29, 2025 | 2:02 PM

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर  मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना धारेवर धरलं.

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर  मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, पहलगाममध्ये पाकिस्तानने निष्पाप लोकांची हत्या केली. भारताने ऑपरेशन सिंदूरला मंजुरी दिली, आणि आपल्या सैन्याने पाकिस्तानी तळ उद्ध्वस्त केले. मी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी सभागृहात उभा आहे.

शहा पुढे म्हणाले, मी अपेक्षा केली होती की, दहशतवाद्यांना ठार मारल्याची बातमी ऐकून विरोधी पक्षात आनंदाची लाट येईल, पण त्यांचे चेहरे पाहता निराशाच दिसली. दहशतवादी मारले गेल्याचा त्यांना आनंदही वाटत नाही. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणले गेले, तेव्हा त्यांची ओळख पटवली गेली. तीन व्यक्तींनी त्यांना ओळखले. आम्हालाही सुरुवातीला विश्वास बसला नाही, म्हणून आम्ही घाई केली नाही.

घटनास्थळी सापडलेली काडतुसे फॉरेन्सिक तपासणीसाठी (एफएसएल) पाठवण्यात आली होती. काल दहशतवाद्यांना ठार मारले गेले तेव्हा त्यांच्याकडे एक अमेरिकन आणि दोन एके-४७ रायफल्स आढळल्या, तसेच काडतुसेही सापडली. ही काडतुसे चंदीगड येथे तपासणीसाठी पाठवण्यात आली, आणि तपासातून पहलगाम हल्ला याच रायफल्सने झाल्याची पुष्टी झाली. शहा यांनी सभागृहात सांगितले की, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, जे मी सभागृहासमोर सादर करेन. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचे मतदार क्रमांक आमच्याकडे आहेत, आणि ते पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांच्या खिशात सापडलेली चॉकलेटसुद्धा पाकिस्तानात बनवलेली होती, असं असूनही देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम विचारत आहेत की अतिरेकी पाकिस्तानातूनच आले होते हे तुम्हाला कसं माहीत? म्हणजे तुम्ही पाकिस्तानला क्लीनचिट देत आहात का? असा संतप्त सवाल देखील यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला.

Published on: Jul 29, 2025 01:11 PM