Praniti Shinde : प्राणिती शिंदेंना चपलेने मारा; वंचितच्या अमोल लांडगेंची जीभ घसरली
Amol Landage Controvercial Statement : प्राणिती शिंदे यांना चपलेने मारा असं वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांनी केलं आहे.
प्राणिती शिंदे सेक्युलर म्हणून मत मागायला आल्या तर चपलेने मारा असं वादग्रस्त वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांनी केलं आहे. प्राणिती शिंदे यांनी बाजार समितीत भाजपसोबत युती केली असल्याचं लांडगे यांनी म्हंटलं आहे. वंचित बहुजन आघाडीला प्राणिती शिंदेंनी बी टीम म्हंटलं होतं.
यावेळी बोलताना लांडगे यांनी म्हंटलं की, कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण कॉंग्रेस पक्ष म्हणून कोणसोबत युती केली हे या जनतेला सांगा. तुम्ही बीजेपी सोबत युती केली आहे. आणि तुम्ही आम्हाला आणि बाळासाहेबांच्या पक्षाला सांगता की आम्ही भाजपची बी टीम आहे. तुमचं नाव घेतल्या बरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्या आहेत. पण मी माझ्या माता बहिणींना विनंती करतो की तुम्ही आत्ता चप्पल काढू नका, निवडणुकीच्या काळात जेव्हा त्य तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना विचारा, असं अमोल लांडगे यांनी म्हंटलं आहे.
