Amravati | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा

| Updated on: Oct 18, 2021 | 7:27 PM

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीही रवी राणा यांनी जोरदार गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी सोयाबीनची होळी केली. सोयाबीनचं कुजलेलं पीक आणि संत्री फेकून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. त्यावेळी राणा समर्थकांनी नियोजन भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Follow us on

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरुन चांगलाच राडा घातलाय. जिल्हा नियोजन बैठक सुरु होताच रवी राणा यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत टाकावी अशी मागणी करणारा ठराव पारित करावा अशी आग्रही मागणी केली. त्यावरुन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

जिल्हा नियोजन समितीतील रवी राणा यांची आक्रमकता पाहून यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना बोलवावं असं फर्मानच सोडलं. मात्र, रवी राणा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण केवळ नौटंकी करत आहात, असा आरोप ठाकूर यांनी रवी राणांवर केला. त्यानंतर संतापलेले रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीही रवी राणा यांनी जोरदार गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी सोयाबीनची होळी केली. सोयाबीनचं कुजलेलं पीक आणि संत्री फेकून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. त्यावेळी राणा समर्थकांनी नियोजन भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.