उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतात, तिथे हनुमान चालिसा म्हणत त्या जागेचं शुद्धीकरण करा- नवनीत राणा

उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतात, तिथे हनुमान चालिसा म्हणत त्या जागेचं शुद्धीकरण करा- नवनीत राणा

| Edited By: | Updated on: Apr 06, 2023 | 11:02 AM

आज खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवसही आहे. अमरावतीच्या बडनेरा मार्गावरील खंडेलवाल लॉनमध्ये भव्य हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...

अमरावती : आज हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज हनुमान चालिसा पठण करत आहेत. नवनीत राणा 21 वेळा सामुहिक हनुमान चालीसा पठण करणार आहेत. चालिसा पठणाला सुरुवात होण्याआधी नननीत राणा यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे जिथे-जिथे सभा घेतात. तिथे हनुमान चालिसा म्हणा. त्या जागेचं शुद्धीकरण करा. कारण उद्धव ठाकरे देवाला मानत नाहीत. ते जातात आणि सभा घेतात. त्यामुळे ती जागा अशुद्ध होते. त्या जागेचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 06, 2023 11:01 AM