Amruta Fadnavis : ठाकरेंच्या ‘कम ऑन किल मी’वर अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार…
शिवसेनेचा काल ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम येथे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे षण्मुखानंद येथे साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधला. यावरूनच अमृता फडणवीस यांनी पलटवार केलाय.
‘आपला शांतताप्रिय देश आहे आणि शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे.’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या. तर आपल्याला कुणी मारेल असा विचार करण्याची गरज नाही, असं म्हणत अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या कम ऑन किल मी या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात प्रहार सिनेमाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी.. असेल हिंमत तरी या अंगावर… फक्त अंगावर येणार असेल अँबुलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून शिंदेंवर हल्लाबोल केला. यावरूनच अमृता फडणवीस यांनी पलटवार केलाय.
Published on: Jun 21, 2025 12:30 PM
