Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

| Updated on: May 01, 2025 | 12:30 PM

Amul Milk Price Hike News: मदर डेअरीनंतर आता अमूलनेही दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने बुधवारी किंमतवाढीची घोषणा केली. ही वाढ आजपासून म्हणजेच १ मे २०२५ पासून लागू होईल. अमूलने विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे.

आपल्या रोजच्या वापरासाठी आवश्यक असणारे दूध आता महागल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मदर डेअरीने आपल्या दूधाची किंमत वाढवली होती. त्यानंतर आता अमूलनेही दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच १ मे २०२५ पासून लागू होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. या वाढीमुळे सर्व प्रकारचे अमूल दूध महाग होणार असल्याचे कंपनीकडून ग्राहकांना सांगण्यात आले आहे. यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे.

अमूल हा भारतातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत बदल केल्यानंतर आता ग्राहकांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.अमूल कंपनीकडून म्हैस आणि गायीच्या दूध दरात दोन रूपयांनी वाढ केली आहे. अमूलने बुधवारी ही घोषणा केली. ही वाढ सर्व प्रकारच्या दुधावर लागू असणार आहे. ५०० मिली पॅकवर १ रुपयांची वाढ होणार आहे.

Published on: May 01, 2025 12:30 PM