नाशिक जिल्ह्यात तुफान गारपीट, शेत पीकं भुईसपाट अन् शेतकरी झाला हवालदिल

नाशिक जिल्ह्यात तुफान गारपीट, शेत पीकं भुईसपाट अन् शेतकरी झाला हवालदिल

| Updated on: Apr 17, 2023 | 8:38 AM

VIDEO | इगतपुरीमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने अश्रू अनावर, कांदा, टॉमेटोसह ही पीकं भुईसपाट

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एक तास तुफान गारपीट झाली. या गारपिटीत शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले असून टमाटे, काकडी, मिरची, वांगे, कोबी इत्यादी विविध प्रकारच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिकं आडवी झाली आहेत. झालेल्या या नुकसानामुळे बळीराजाला आपले अश्रू अनावर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारे पंचनामे किंवा मदत जाहीर करण्यात आली नाही. अशातच काल परवा झालेल्या गारपीटचा तडाखा शेतकऱ्यांना पुन्हा बसला आहे. हाता-तोंडाशी आलेला बळीराजाच्या घास अवकाळी पावसाने हिरवून घेतल्याची भावना या बळीराजाची आहे.

Published on: Apr 17, 2023 08:31 AM