Anandrao Adsul | आनंदराव अडसूळ साडेचार तासांपासून रुग्णालयात दाखल, ईडीचे अधिकारीही उपस्थित

Anandrao Adsul | आनंदराव अडसूळ साडेचार तासांपासून रुग्णालयात दाखल, ईडीचे अधिकारीही उपस्थित

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 4:34 PM

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.

ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात असल्याची माहिती आहे.

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.