त्यांनी माझ्या मुलीचे 2 लग्न मोडले, त्यामुळे..; वैष्णवीच्या वडिलांचा मोठा दावा
Vaishnavi Hagawane Case : आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांवर भाष्य केलं आहे.
हगवणे कुटुंबामुळे माझ्या मुलीचे 2 लग्न मोडले. त्यामुळे मला नाईलाजाने तिचे लग्न शशांक सोबत लाऊन द्यावे लागले, असं वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. मात्र याविषयी मी अधिक काही सध्या बोलू शकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असंही कस्पटे म्हणाले.
हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी काल न्याकयालयात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्याचबरोबर अनेक अजब दावे केले. त्यावर आज वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तसंच हगवणे कुटुंबाने फॉरच्युनर कार आणि दीड लाखाचा मोबाईल कशाप्रकारे हट्ट करून घेतला याबद्दल देखील स्पष्टीकरण दिलं. याचवेळी बोलताना त्यांनी नाईलाज झाल्याने वैष्णवीचं लग्न शशांक सोबत लाऊन द्यावं लागलं, यांच्यावर दबाव होता, असा मोठा दावा देखील केला आहे.
Published on: May 29, 2025 05:47 PM
