किरीट सोमय्या यांनी यावं, आमच्या पद्धतीने स्वागत करू; अनिल परब यांचं ओपन चॅलेंज
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. सोमय्यांना त्यांनी इशारा दिलाय पाहा...
मुंबई : किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आमच्या स्टाईलने आम्ही त्यांचं स्वागत करू, असं अनिल परब म्हणालेत. किरीट सोमय्यांना आम्ही मोजत नाही, पण आता हा फक्त माझा प्रश्न राहिला नाही. तर म्हाडात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या घरांचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी मी सध्या रस्त्यावर उतरलो आहे, असं अनिल परब म्हणालेत. अनिल परब यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Published on: Jan 31, 2023 12:12 PM
