Anil Parab : अधिवेशनाच्या कामकाजात आणली लिंबू मिरची; काय आहे प्रकार?

Anil Parab : अधिवेशनाच्या कामकाजात आणली लिंबू मिरची; काय आहे प्रकार?

| Updated on: Jul 02, 2025 | 6:38 PM

Maharashtra Assembly Mansoon Session : विधानपरिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट लिंबू मिरची आणली.

अनिल परब यांनी विधानपरिषदेत लिंबू मिरची दाखवत भरत गोगवले यांच्यावर टीका केली आहे. रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू आहे, पालकमंत्री पदावरून आमच्या बहिणीबाबत बरंवाईट मनात असू शकतं असं म्हणत परब यांनी अदिती तटकरे यांच्याबाबत बोलताना भरत गोगवले यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी विधानपरिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट लिंबू मिरची आणली. अनिल परब म्हणाले, लाडक्या बहिणींना सुरक्षा देत आहात, योजना आणली चांगली गोष्ट आहे. पण आपल्या बहीणींच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो, असा माझा प्रश्न आहे. सध्या तांत्रिक-मांत्रिक युगात, जे काही रायगड जिल्ह्यात सुरू आहे. तंत्र मंत्र अघोरी प्रकार सुरू आहेत. मला काळजी वाटते जाता येता आपल्या बहीणीवर कोणी मंत्र मारू नये, अघोरी प्रकार घडू नये. मी अंधश्रद्धा मानत नाही, पण सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावे, जे काही अघोरी प्रकार रायगड जिल्ह्यात बघितले गेले. रेडे कापले असतील, बैल कापले गेले असतील अशा बळींपासून सुरक्षा मिळावी म्हणून मी हे लिंबू मिरची देऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले.

Published on: Jul 02, 2025 06:38 PM