Anjali Damania : ‘धनंजय मुंडे माझ्या घरी आले, मी पंकजा मुंडेंविरोधात…’, अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

Anjali Damania : ‘धनंजय मुंडे माझ्या घरी आले, मी पंकजा मुंडेंविरोधात…’, अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Apr 01, 2025 | 2:36 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक मोठा आरोप केला. धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आणि एकच खळबळ उडाली आहे.

‘पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते’, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं. पुढे त्या असंही म्हणल्या, मी पंकजा मुंडे यांच्याविरोधात लढावं, असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असं म्हणत अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अंजली दमानिया यांनी हा मोठा आरोप केला. मी असं कधीही लढत नसल्याचे धनंजय मुंडे यांना सांगितलं, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तर यानंतर धनंजय मुंडे फाईल्स इथेच ठेवून निघून गेल्याची माहिती देखील अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत माझ्या घरी आले होते. ते पंकजा मुंडे यांच्याविरोधातील पूर्ण फाईल्सचा ठोकळा घेऊन आले होते. त्यावेळी मी त्यांना समजवलं की दिलेल्या फाईल्सवर मी कोणतंही काम करत नाही’, असं त्यांनी म्हटलं. बघा अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

Published on: Apr 01, 2025 02:36 PM