Pankaja Munde PA Wife Death : ‘त्या’ बाईच्या गर्भपातावेळी अनंत गर्जेचं नाव… दमानियांनी माहिती देताना फोडला मोठा बॉम्ब
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये बदल केले असून अंजली दमानिया यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. गौरीला मारहाण होत असल्याचे मैत्रिणींनी सांगितले असून, अनंत गर्जेच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या संबंधांमुळे वाद वाढल्याचेही समोर आले आहे.
वरळी येथे पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. गौरीच्या कुटुंबाने हा आत्महत्या नसून, खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुरुवातीला आत्महत्येची नोंद असलेल्या एफआयआरमध्ये कुटुंबीयांच्या आक्षेपानंतर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतर दुरुस्ती करण्यात आली आहे.
अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना त्यांच्या पीएविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना देण्याचे आवाहन केले आहे. गौरीच्या मैत्रिणींनी तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा पाहिल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे तिला सतत मारहाण होत असल्याचा संशय बळावला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जेच्या किरण इंगळे नावाच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या संबंधांचे कागदपत्रे गौरीला मिळाल्याने त्यांच्यात वाद वाढले होते, असे दमानिया यांनी सांगितले.
