Anjali Damania : नुसतं तत-पप, धड बोलताही येत नव्हतं; तो कॉन्फिडन्स त्यांच्यात नव्हता, कोकाटेंवर दमानियांचा हल्लाबोल

Anjali Damania : नुसतं तत-पप, धड बोलताही येत नव्हतं; तो कॉन्फिडन्स त्यांच्यात नव्हता, कोकाटेंवर दमानियांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 22, 2025 | 2:14 PM

महाराष्ट्रात जे घडतंय. त्यानंतर फक्त राजीनामे घेऊन चालणार नाही. त्यांच्यावर कारवाई करा, आज मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मला सांगायचंय आता महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही, असं म्हणत अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला.

माणिकराव कोकाटेंचा रमी व्हिडीओ बघितला आणि आज झालेली पत्रकार परिषद बघितली. त्यांचं तत पप होत होतं. त्यांनी धड बोलताही येत नव्हतं. त्यात त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर सांगितला. मी कधीच आयुष्यात ऑनलाईन रमी खेळलो नाही, असं म्हणाले पण हे बोलताना जो आत्मविश्वास लागतो तो त्यांच्यात नव्हता, असं म्हणत अंजली दमानियांनी कोकाटेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पुढे त्या असंही म्हणाल्या की, कोकाटेंनी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवत पत्रकार परिषद घेतल्याचा आव आणला. पण पत्रकारांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यांना मुद्देसूद सवाल केले पण त्याची त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. कोकाटेंच्या कृतीचा निषेध करायला काही माणसं सुनील तटकरेंकडे गेली. तेव्हा त्यांनी तिथे पत्ते टाकले म्हणून सुरज चव्हाणने त्या लोकांना बेदम मारलं. त्यांच्यावर 11 जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत. पण त्यांना अटक झाली नाही. सूरज चव्हाण यांनी फक्त एका पदाचा राजीनामा दिला पण त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली.

Published on: Jul 22, 2025 02:14 PM