अण्णा हजारे वयाच्या 87व्या वर्षी मैदानात, महायुतीतील ‘या’ दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी, म्हणाले…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महायुतीतील दोन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात घेताना आधी विचार करणं गरजेचं असल्याचे म्हणत सरकारवरच अण्णा हजारे यांनी हल्लाबोल केला आहे.
‘आरोप झालेल्या मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे’, असं वक्तव्य करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महायुतीतील दोन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात घेताना आधी विचार करणं गरजेचं असल्याचे म्हणत सरकारवरच अण्णा हजारे यांनी हल्लाबोल केला आहे. तर मंत्रिमंडळात राहून ज्यावेळी आरोप होतात त्यावेळी एक क्षणसुद्धा त्या पदावर राहणं हा दोष असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे, असे सांगत अण्णा हजारे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यासाठी अर्थात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अशातच राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर भाष्य केले आहे.
