एक लाख एसटी कर्मचारी अंगावर आले तर काय कराल, राज ठाकरेंचा सूचक इशारा

एक लाख एसटी कर्मचारी अंगावर आले तर काय कराल, राज ठाकरेंचा सूचक इशारा

| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 1:43 PM

चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे.

चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अधिकृत बोलावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी त्यांनी साऱ्या विषयावर आपले मत व्यक्त केले. मात्र, महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार का, या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल दिली.