Aryan Khan Bail | आर्यनची सुटका आज नेमकी का नाही झाली ?

Aryan Khan Bail | आर्यनची सुटका आज नेमकी का नाही झाली ?

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 8:18 PM

आर्यन खानच्या जामिनाची ऑर्डर कॉपी एनडीपीएस कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात साडेपाच पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

मुंबई: आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी काल जामीन मिळाला. पण कोर्टाची ऑर्डर मिळाली नाही. त्यामुळे त्याची कालची रात्र तुरुंगात गेली. आज तो कोणत्याही परिस्थितीत तुरुंगाबाहेर येईल असं सांगितलं जात होतं. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ गेल्याने आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे त्याची आजची रात्र मन्नत ऐवजी तुरुंगातच जाणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी आज दिवसभर आर्यनचे वकील आणि किंग खान शाहरुख खानची धावपळ सुरू होती. पण आजही त्यांच्या पदरी निराशा आली. आर्यन खानच्या जामिनाची ऑर्डर कॉपी एनडीपीएस कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात साडेपाच पर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळूनही आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. आता लिगल टीम आज संध्याकाळी ऑर्डर कॉपी तुरुंग प्रशासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर उद्या शनिवारी त्याची सकाळी 11 वाजता सुटका होईल.