Aryan Khan Released | आर्यन खानचा मन्नत ते जेलचा प्रवास नेमका कसा होता ?

Aryan Khan Released | आर्यन खानचा ‘मन्नत’ ते ‘जेल’चा प्रवास नेमका कसा होता ?

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 8:46 PM

आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला.

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका झाली आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची  ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे. आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.