शरद पवार यांच्यामुळे विरोधकांची चिंता वाढली; पवार दिल्लीला जाणार की पुण्यातच थांबणार?

शरद पवार यांच्यामुळे विरोधकांची चिंता वाढली; पवार दिल्लीला जाणार की पुण्यातच थांबणार?

| Updated on: Jul 30, 2023 | 8:19 AM

विरोधकांच्या इंडियाकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. तर आता केंद्रातील मोदी सरकारच्या दिल्ली सरकारच्या अध्यादेश विरोधात देखील विरोधकांनी कंबर कसली आहे. या अध्यायदेशावर संसदेत सोमवार किंवा मंगळवारी मतदान होण्याची शक्यता आहे.

पुणे, 30 जुलै 2023 | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. तर देश तापळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधाक विरोधक जकजूट झाले आहे. विरोधकांच्या इंडियाकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. तर आता केंद्रातील मोदी सरकारच्या दिल्ली सरकारच्या अध्यादेश विरोधात देखील विरोधकांनी कंबर कसली आहे. या अध्यायदेशावर संसदेत सोमवार किंवा मंगळवारी मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र याच्याआधीच आता विरोधकांची चिंता वाढली आहे. कारण आता या मतदानाला ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहण्याची शक्यता नाही. कारण लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि त्याच कार्यक्रमात पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधकांच्यात चिंता वाढली आहे. तर पवार हे आता या कार्यक्रमासाठी पुण्यात थांबणार की विरोधकांच्या एकजूटिसाठी राज्यसभेत मतदानासाठी दिल्लीला जाणार हे पाहावं लागणार आहे.

Published on: Jul 30, 2023 08:07 AM