VIDEO : Ashish Shelar | ठाकरे सरकारच्या लहरीपणाने विद्यार्थ्यांचं नुकसान, आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका
भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानं ठाकरे सरकारच्या “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.
महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशसाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी होणारी सीईटी ( FYJC CET Cancelled ) परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानं ठाकरे सरकारच्या “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.
