Ashish Shelar | करण जोहरच्या पार्टीत कोणी मंत्री होता का? शेलारांचा बीएमसीला सवाल

Ashish Shelar | करण जोहरच्या पार्टीत कोणी मंत्री होता का? शेलारांचा बीएमसीला सवाल

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 7:37 PM

बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणी मंत्री होता का? असेल तर त्यांनी पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी शंकाच आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.

मुंबई: बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणी मंत्री होता का? असेल तर त्यांनी पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी शंकाच आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही शंका उपस्थित केली आहे. करण जोहरच्या पार्टीवरून संभ्रमाचे वातावरण दिसते निर्माण झाले आहे. या पार्टीत राज्‍य शासनातील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्‍या इमातीचे सीसीटीव्‍ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्‍यामध्‍ये त्‍या पार्टीमधील अन्‍य लोकांनी पालिकेकडून टेस्‍ट केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी हरकिशनदास रूग्‍णालयात चाचण्‍या केल्‍या आहेत, असं सांगतानाच या पार्टीत किती लोक होती?, अशी शंका निर्माण होत आहे. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्‍याची खेळू नये, असे शेलार यांनी म्हटलं आहे.

Published on: Dec 16, 2021 07:37 PM