Ashish Shelar : ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर आशीष शेलार यांची खोचक टीका
Ashish Shelar On Thackeray Brothers : भाजप नेते आशीष शेलार यांनी 5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका केली आहे.
भाजप नेते आशीष शेलार यांनी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 5 जुलै रोजी होणाऱ्या विजय मेळाव्यावर आपल्या भाषणातून टीका केली आहे. एकट्या पक्षाकडून लोक जमतील असं वाटलं नाही म्हणून अनेक पक्षांना सोबत घेतलं आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
यावेळी बोलताना आशीष शेलार म्हणाले की, दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, आमचा जल्लोष आहे, असं प्रचार करून देखील लोक जमतील असं एका पक्षाला वाटलं नाही. म्हणून बरेच पक्ष एकतर येऊन डोममध्ये बऱ्याच पक्षांचं होणार आहे, त्यापेक्षा एकटा पक्ष, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तुत्व याचा व्हिडीओ बघा, अशी टीका यावेळी शेलार यांनी केली. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष काळात केलेल्या कामाचं कौतुक देखील यावेळी शेलार यांनी केलं आहे.
Published on: Jul 01, 2025 07:45 PM
