Beed News : पावसामुळे काढणीला आलेले टोमॅटो सडले; तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्याला अश्रु अनावर

Beed News : पावसामुळे काढणीला आलेले टोमॅटो सडले; तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्याला अश्रु अनावर

| Updated on: Jun 03, 2025 | 11:57 AM

Unseasonal Rain Damaged : अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसलेला आहे. बीडच्या आष्टीत देखील पावसामुळे टोमॅटो बागांना मोठं नुकसान झालेलं आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसामुळे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी भरलं आहे. त्याचा फटका टोमॅटो पिकांना बसला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

आष्टी तालुक्यात आधी अवकाळी आणि नंतर मान्सूनच्या पावसामुळे टोमॅटो बागांना चांगलाच फटका बसला आहे. काढणीला आलेले टोमॅटो पावसामुळे सडले आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावला गेल्याने शेतकऱ्याला अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले. पूर्ण शेतात पाणी झाल्याने टमाट्याची झाडं उपटून फेकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आलेली आहे. एकीकडे सरकार कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पावसाचा कहर, यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Published on: Jun 03, 2025 11:52 AM