Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी

| Updated on: Mar 06, 2025 | 5:03 PM

Asim Sarode On Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवावी अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. बीड प्रकरणात कोर्टाचं काम लोकांना पाहू द्या असं सरोदे यांनी म्हंटलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. बीड प्रकरणात कोर्टाच कामकाज लोकांना देखील पाहूद्या, असंही असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र सादर केलं आहे. आता या प्रकरणावर खटला चालणार आहे. 12 मार्चला या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे. ही सुनावणी कोर्टाने लाईव्ह दाखवावी असं असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोर्टाच कामकाज लोकांनाही बघू द्या असं सरोदे म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टात ज्याप्रकारे सुनावणी लाईव्ह दाखवली जाते तसंच लाईव्ह स्ट्रीमिंग बीडच्या प्रकरणात देखील करण्यात यावं अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

Published on: Mar 06, 2025 05:03 PM