Special Report : 16 आमदारांवरून राहुल नार्वेकर अॅक्शनमोडमध्ये, काय सुरू केली प्रक्रिया?

| Updated on: May 28, 2023 | 9:06 AM

VIDEO | 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून प्रक्रिया सुरू, बधा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

मुंबई : 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून प्रक्रिया सुरू केली आहे. नार्वेकर हे शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडून मागवणार आहेत. राजकीय पक्ष नेमका कोणाचा? हे ठरवून नार्वेकर निर्णय घेणार आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेत आहेत, त्यानुसार नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाच्या घटनेच्या आधारावरच मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितल तर ठाकरे गटाचं यावर म्हणणं आहे की, एकनाथ शिंदेंकडे मूळ पक्षाची घटनाच नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं म्हटलं विधीमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करतो. त्यामुळे मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवल्यानंतरच प्रतोद कोण हे राहुल नार्वेकर यांना ठरवावं लागेल. शिवसेनेत फूट पडली त्यावेळची स्थिती काय होती. हा मुद्दा खूप महत्त्वाची आहे. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत फूड पडली. एकनाथ शिंदे बंडखोर आमदांसह सूरतला रवाना झाले. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी भाजपच्या मदतनीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत. १७ फेब्रुवारी २०२३ ला शिवसेना. धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदेंना देण्यात आलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट