Attari Border : अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
India - Pakistan Borders Updates : अटारी बॉर्डरपासून काही किलोमीटर आतमध्ये असलेल्या एका गावातल्या शेतात संशयादस्पद वस्तु सापडली आहे. याठिकाणी भारतीय सैन्य दलाकडून तपास केला जात आहे.
भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटारी बॉर्डरपासून काही किलोमीटर आतमध्ये काही गावं आहेत. त्यातल्या महुआ गावाच्या शेतात ड्रग्स सापडल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय लष्कराचे जवान सध्या याठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून येथे सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. मागच्या काही वेळापासून या ठिकाणी ड्रग्सचा शोध घेतला जात आहे. बीएसएफचे जवान या ठिकाणी शेतात दाखल झाले आहेत. आज सकाळी येथे ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं स्थानिकांनी भारतीय जवानांना सांगितलं होतं. यानंतर हे जवान शेतात तपासासाठी दाखल झाले आहेत.
Published on: May 04, 2025 05:11 PM
