Mumbai | मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याहस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडत असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याहस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडत असताना एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जळगाव जिल्ह्यातला असल्याचं सांगितलं जातंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय.
मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
आज भारताचा 75 वा स्वातंत्रदिन, त्याचनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं. याचवेळी मंत्रालयाच्या गेटवर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तत्रेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
Published on: Aug 15, 2021 11:21 AM
