Padalkar Vs Awhad : विधानभवनात पहिले शिवीगाळ, नंतर तुंबळ हाणामारी; पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली
आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या परिसरात भिडलेले आहेत. यामुळे चांगलाच गोंधळ झालेला बघायला मिळाला.
आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या परिसरात भिडलेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला बघायला मिळाला. काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधान भवनाच्या परिसरातच बाचाबाची झाली होती. गाडीच्या दाराला धक्का लागल्याच्या कारणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ देखील केली होती. हा राडा शांत झाल्यानंतर आता आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसून आली. यामुळे विधानभवनात चांगलाच गोंधळ उडालेला बघायला मिळाला. या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Published on: Jul 17, 2025 06:09 PM
