Shubhanshu Shukla : शून्य गुरुत्वाकर्षण अन् हवेत तरंगत मेजवाणीवर ताव, शुभांशूची अंतराळात दणक्यात पार्टी, फोटो एकदा बघाच

Shubhanshu Shukla : शून्य गुरुत्वाकर्षण अन् हवेत तरंगत मेजवाणीवर ताव, शुभांशूची अंतराळात दणक्यात पार्टी, फोटो एकदा बघाच

| Updated on: Jul 11, 2025 | 2:00 PM

14 जुलैपासून शुक्ला आणि इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी घोषणा नासाने काल संध्याकाळी केली.  बघा शुभांशूच्या पार्टीचे समोर आलेले फोटो

घरी परतण्यापूर्वी शुभांशू शुक्लाची अंतराळात दणक्यात पार्टी झाल्याचे मनोरंजक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.  शुभांशू शुक्ला याने इतर सहकाऱ्यांसोबत मेजवानीचा आनंद घेतला आहे. दरम्यान, 14 जुलै रोजी शुभांशू शुक्लाचा अंतराळातून भारताच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला 14 जुलैपासून आंतरराष्ट्रीय अंतराळातून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. घरी परतण्याच्या काही दिवस आधी, तो आणि इतर सहकारी, सदस्य काही पदार्थांच्या मेजवाणीवर ताव मारताना दिसले. ज्यांचे फोटो आयएसएस वरून दाखवण्यात आली. अंतराळात गेल्यानंतर मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्लाने शेवटच्या टप्प्यात एका शेतकर्‍याची भूमिका बजावली. त्याने पेट्री डिशमध्ये मूग आणि मेथीची लागवड केली. शुभांशूने ते स्पेस स्टेशनच्या फ्रीजरमध्ये ठेवले. समोर आलेल्या फोटोंमध्ये, शुभांशू आणि त्याचे साथीदार शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगताना दिसतात आणि अन्नाचा आनंद घेत जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. 

Published on: Jul 11, 2025 01:48 PM